Self Marriage : गुजरातमधील ही तरुणी करणार स्वतःशीच लग्न, एकट्या लग्नाचे अनोखे प्रकरण

WhatsApp Group

Self Marriage : ऐकावे ते नवलच. आजवर आपण अनेक विवाह (Marriage) पाहिले असतील. ज्यात वर-वधू म्हणजेच नवरा-नवरी नटून थटून येतात एकमेकांना जाहीरपणे वरमाला घालतात आणि विवाहबद्ध होतात. गुजरात येथील वडोधरा येथे मात्र काहीसे वेगळेच घडते आहे. येथील क्षमा बिंदू (Kshama Bindu) ही 24 वर्षांची तरुणी विवाहबद्ध होते आहे. धक्कादायक असे की ही तरुणी विवाहबद्ध तर होते आहे पण स्वत:शी. ऐकून धक्का बसला ना? होय, ही तरुणी स्वत:सोबत विवाह ( Self-Marriage) करत आहे.

क्षमा बिंदू हिचा विवाह 11 जून रोजी पार पडणार आहे. त्यासाठी विवाहाचा हॉल, स्टेज, सजावट सगळे काही तयार आहे. फक्त एका गोष्टीची कमी आहे. ती म्हणजे नवरदेवाची. क्षमा स्वत:सोबत विवाहबद्ध होणार असल्यामुळे अर्थातच तिथे नवरदेव नसणार हे उघडच आहे. या लग्नाची मात्र समाज आणि प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

सांगितले जात आहे की, हा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. ज्यात फेरे, सिंदूर आणि इतर अनेक पारंपरा पाळल्या जातील. अपवाद फक्त नवरदेव आणि वरातीचा असणार आहे. जसे या लग्नात नवरदेव नसणार आहे तसाच या लग्नाची वरातही निघणार नाही. गुजरातमधील हा बहुदा पहिलाच स्व-विवाह असावा.

आपले आई-वडील स्वतंत्र विचारांचे आहेत. त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. समाजात काही लोकांना कदाचित हे विचित्र वाटू शकते. पण त्याने काही फरक पडत नाही. मी लग्नानंतर दोन दिवसांचा हनिमून प्लानही तयार केला आहे. त्यासाठी मी गोव्याला जाणार असल्याचेही क्षमा म्हणाली आहे.