
Christmas 2022: ख्रिसमस (Christmas 2022) हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात महत्वाचा आणि जगातील सर्वात लोकप्रिय सण आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी हा सण साजरा करण्यात येतो. या उत्सवाला प्रत्येक जाती-धर्मात समान लोकप्रियता मिळाली आहे. यानिमित्ताने रंगीबेरंगी सजावट आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे या उत्सवात सर्वधर्मातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. ईसाई बांधव हा सण मोठया आनंदाने साजरा करतात. या दिवशी जिसस ख्रिस्त (Jesus Christ) म्हणजेच प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाला असं सांगितलं जातं. त्यांच्या जन्माच्या आनंदात हा सण साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र (Son of God) असं म्हटलं जाते. ख्रिसमस (Christmas) हे नाव देखील ख्रिस्तापासून पडले आहे.
‘ख्रिसमस’ नाव कसे पडले?
‘ख्रिसमस’ हा शब्द ‘ख्रिसमस आणि मास’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे जो मध्य काळातील इंग्रजी शब्द ‘ख्रिस्टेमसे’ आणि ‘ख्रिस्टेसमैस’ या जुन्या इंग्रजी शब्दापासून कॉपी केला करण्यात आला. 1038 पासून याला ‘ख्रिसमस’ असं म्हटलं गेलं. यामधील ‘ख्रिस’ म्हणजे येशू ख्रिस्त आणि ‘मास’ म्हणजे ख्रिश्चनांचा प्रार्थना समूह किंवा ‘मास’ आहे.
ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो?
बायबलमध्ये येशूची (jesus christ) जन्मतारीख दिलेली नाही परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या तारखेबाबत अनेक वाद झाले. परंतु ख्रिस्तपूर्व 336 मध्ये पहिल्या ख्रिश्चन रोमन सम्राटाच्या (First Christian Roman Emperor) काळात 25 डिसेंबरला पहिला ख्रिसमस (First Christmas) साजरा करण्यात आला. याच्या काही वर्षांनंतर पोप ज्युलियसने (Pop Julius) अधिकृतपणे 25 डिसेंबर रोजी येशूचा जन्म साजरा करण्याची घोषणा केली.
Christmas Wishes In Marathi: नाताळच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये
कसा साजरा केला जातो ख्रिसमस?
जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतात ख्रिश्चन बांधवांची लोकसंख्या कमी आहे. तरी देखील हा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटून पार्टी करतात, फिरतात आणि चर्चमध्ये प्रार्थना करतात. ख्रिस्ती बांधव आपल्या घराला सजवितात. ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांना सॉक्समधून भेटवस्तू दिल्या जातात. अनेक शाळांना या दरम्यान आठ दिवसांची सुट्टी देखील असते. घरी केक बनवले जातात आणि सर्व्ह केले जातात. भारतात विशेषत: गोव्यामध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा