नवी दिल्ली – उद्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. जीएसटीमुळे करप्रणालीमध्ये बदल झाले आहेत त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होणार आहेत. बहूतांश वस्तू या जीएसटी कौन्सिलच्याअंतर्गत येतात.
1 फेब्रुवारी 2018 रोजी सादर केल्या गेलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सीमाशुल्काच्या संदर्भात अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. जीएसटीच्या संदर्भातील किंमती 1 एप्रिल पासून अंमलात येणार आहेत. आयात करण्यात येणाऱ्या काही वस्तू उद्यापासून महाग होणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
या वस्तु होणार महाग
मोबाईल फोन, सोने, चांदी, भाजीपाला, फळांचे रस, सन ग्लासेस, नानाविध खाद्यपदार्थ, सनस्क्रिन, हात, नखे आणि पायांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दातांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दंतचिकित्सेसाठीची साधने आणि पॉवडर , दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रिम आणि तत्सम वस्तू, डिओड्रंट, परफ्यूम्स, सेंट्स, ट्रक आणि बसचे टायर्स, रेशमी कपडे, पादत्राणे, रंगीत खडे, हिरे, इमिटेशन ज्वेलरी, स्मार्ट घड्याळे, एलईडी आणि एलसीडी टीव्ही, फर्निचर, दिवे, व्हिडीओ गेम, तीनचाकी सायकली, स्कूटर, चाकाची खेळणी, बाहूल्या, खेळणी, खेळाची साहित्य, सिगारेट, मेणबत्त्या, पतंग, खाद्य तेल
या वस्तु होणार स्वस्त
कच्चा काजू, सोलार टेम्पर्ड ग्लास, कॉक्लियर (कानाशी संबंधित यंत्रे) प्रत्यारोपणासाठी लागणारी कच्ची सामुग्री आणि साधने आणि काही निवडक इलेक्ट्रॉनिक वस्तू
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook