Shocking: अंतराळात कापडातील पाणी पिळल्यावर काय होते? पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाण्याचे बुडबुडे तरंगतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर कोणी अंतराळात ओला टॉवेल पिळला तर पाण्याचे काय होईल? ट्विटरवर एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, एक अंतराळवीर पाण्यात भिजलेला टॉवेल पिळून घेतो तेव्हा काय होते ते पाहू शकतो.

कमांडर ख्रिस हॅडफिल्ड यांनी वॉशक्लोथवर पाण्याची पिशवी पिळली आणि पाणी पूर्णपणे टॉवेलमध्ये ओतले. तळाशी पाण्याचा थेंबही पडला नाही.  टॉवेल ओला केल्यानंतर, यात अंतराळवीराने टॉवेल कॅमेरासमोर ठेवला आणि त्याची दोन टोके विरुद्ध दिशेने फिरवली. या व्हिडिओमध्ये हॅडफिल्डने वॉशक्लोथ पिळून काढल्यावर काय झाले ते व्हिडिओमध्ये पाहू शकता.