
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बेकेसीमध्ये सभा घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फडणवीस-राज-राणा-सोमय्यांवर काय बोलले वाचा सविस्तर..
महाराष्ट्रला बदनाम करण्याची तयारी सुरु आहे. तुम्ही भ्रष्टाचारी आहात, भ्रष्टाचाराचे प्रकरणं समोर येत आहेत. तुम्ही या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सोबत बसू, सोबत काम करु असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचे उदाहारण देऊन राज ठाकरेंवरती नाव न घेता टीका केली आहे. हल्ली एकाला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते आहे. बाळासाहेबांची शाल घालून फिरत आहेत, फिरु द्या आपल्याला काही फरक पडत नाही. राज्यात अनेक प्रकल्प केंद्राने मुद्दाम अडवून धरले आहेत. पुरातत्व विभागाने आपले अनेक कामे अडवून धरले आहेत. औरंगजेबाच्या कबरीचे संवर्धन केले जाते मग आपल्या मंदिराचे काम का रोखता? तिकडे जाऊन बोला असे मुख्यमंत्री म्हणाले आहे.
क्रिकेटमधला एक किस्सा सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांवरती टीका केली आहे. खोटे गुन्हे दाखल कराल तर हा महाराष्ट्र पेटेल. ईडी, सीबीआय लावत असाल खोटे गुन्हे दाखल करत असाल तर महाराष्ट्र पेटेल असं मुख्यमंत्री म्हणाले. आता तरी सुधरा, तिकडे श्रीलंकेत काय सुरु आहे पाहा, रावणानाची लंका का पेटली ते पाहा….आमचे हिंदुत्व घर पेटवणारे नाही तर घर बसवणारे पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळच्या शपथविधीवर टीका केली. आम्ही काँग्रेससोबत गेलो कारण तुम्ही आम्हाला दूर केले. मी विधानसभेमध्ये सांगितले आहे, मला सत्तेची लालच नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो कारण तुम्ही आम्हाला दूर केले म्हणून आम्हाला जावे लागले. याच भाजपने मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते.
बाबरी पाडायला गेलो होते असं फडणवीस म्हणाले होते, तेव्हा तुमचे वय काय होते? सहलीला गेले होते का? देवेंद्रची तुम्ही जर खरच बाबरी मशिद पाडायला गेला असता तर तुमच्या फक्त वजनानेच बाबरी पडली असती अशी टीका फडणवीसांवर केली आहे.