राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांनी पुकारलेला ‘ओला दुष्काळ’ ऑनलाईन ट्रेंड मोठ्या प्रमाणात यशस्वी

WhatsApp Group

ओला दुष्काळ प्रश्नी पक्ष, पार्ट्या, झेंडे यांच्या पलीकडे जात राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांनी पुकारलेला ऑनलाईन ट्रेंड आज मोठ्या प्रमाणात यशस्वी होतोय. पत्रकार, बुद्धिजीवी, विचारवंत, मध्यमवर्गीयांचा मोठा प्रतिसाद ऑनलाईन ट्रेंडला मिळतो आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने ऑनलाईन ट्रेंडमध्ये व्यक्त होणाऱ्या या उद्रेकाची योग्य दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास रस्त्यावर उतरून आरपरचा संघर्ष करावा लागेल. किसान सभेचे राज्याचे अधिवेशन दि. 31 ऑक्टोबर व 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात होत आहे.

केंद्र तसेच राज्याचे नेतृत्व व राज्यभरातील निवडलेले 300 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी 3 दिवस एकत्र असणार आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पोरांनी आज सुरू केलेल्या ऑनलाईन ट्रेंडची योग्य दखल घेतली नाही तर या अधिवेशनात विचार विनिमय करून राज्यात भव्य आंदोलन केले जाईल.