सुप्रसिद्ध WWE स्टार ट्रिपल एचने निवृत्तीची घोषणा केली आहे. याचा अर्थ ट्रिपल एच यापुढे रिंगमध्ये दिसणार नाही. ट्रिपल एचने ईएसपीएनच्या फर्स्ट टेक शोमध्ये स्टीफन स्मिथच्या मुलाखतीत याची पुष्टी केली. ट्रिपल एचचे नुकतेच हृदयाचे ऑपरेशन झाले आहे.
ट्रिपल एचने मुलाखतीत सांगितले की, ‘मी खूप काही केले आहे. मी आता पुन्हा रिंगमध्ये उतरणार नाही. हा निर्णय स्वीकारणे कठीण आहे. असं ट्रिपल एच म्हणाला आहे.
BREAKING: @TripleH announced his retirement from in-ring competition on @espn @firsttake with @stephenasmith. pic.twitter.com/qnyw9NVtv4
— WWE (@WWE) March 25, 2022
अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथे जन्मलेल्या ट्रिपल एचचे खरे नाव पॉल मायकेल लेवेस्क आहे. ट्रिपल एचने 1992 मध्ये IWF (इंटरनॅशनल रेसलिंग फेडरेशन) सह कुस्ती कारकीर्द सुरू केली, जिथे त्याला ‘टेरा रायझिंग’ हे नाव देण्यात आले.
1995 मध्ये WWE च्या जगात पाऊल ठेवल्यानंतर त्याला ‘हंटर हार्ट्स हेमस्ले’ हे नवीन नाव मिळाले. त्याच नावाच्या पहिल्या तीन इंग्रजी अक्षरांमुळे लोक त्याला ‘ट्रिपल एच’ म्हणून ओळखू लागले.
ट्रिपल एचने आपल्या कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही आणि अनेक वेळा WWE चे विजेतेपद पटकावले. गेल्या 25 वर्षांत अनेक सुपरस्टार आले आणि गेले, पण ट्रिपल एचने विरोधी खेळाडूंना धूळ चारत आपल्या कामगिरीने नाव कमावले आहे. निवृत्तीनंतरही, ट्रिपल एच त्याच्या संस्मरणीय कामगिरीद्वारे WWE आयकॉन बनून राहील.