
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याचवेळी काही राज्यांतून मान्सूनचे प्रस्थान सुरू झाले आहे. हवामान खात्यानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत नैऋत्य मोसमी पावसाची माघार वायव्य भारतातील काही भाग आणि पश्चिम भारताच्या काही भागांतून सुरू होईल. 29 सप्टेंबरपासून भारताच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. IMD ने अंदमान आणि निकोबार बेटांवर 30 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
दिल्लीत पावसाची पावसाची शक्यता कमी आहे. हवामान खात्यानुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांव्यतिरिक्त मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक, केरळ, ओडिशा या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
इतर राज्यांबद्दल बोलायचे तर बंगाल, झारखंड, दक्षिण बिहार, उत्तर ओडिशा, उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस होऊ शकतो. याशिवाय राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये अवघे काही दिवस उरले आहेत. आता महिन्याच्या उरलेल्या दिवसांत मुंबईच्या काही भागात पाऊस पडू शकतो. आज 28 सप्टेंबर आणि उद्या 29 सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 30 सप्टेंबर रोजी हलका पाऊस पडू शकतो.