राज्यासाठी पुढील १२ तास धोक्याचे; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

WhatsApp Group

नागपूर – राज्यात पुन्हा एकदा हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे. मध्यंतरी विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने जाहीर केले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पारा अचानक खाली आहे. रविवारी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. आजही असेच काहीसे वातावरण असणार आहे.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

‘२२ आणि २३ मार्चला पावसाचा अंदाज’
कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी २२ आणि २३ मार्चला पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे यांनी वर्तवला आहे. उर्वरित राज्यामध्ये मात्र हवामान कोरडे राहणार. रविवारी मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे २.६, महाबळेश्वर येथे २.३, नाशिक येथे ३.७, सातारा येथे ३.५, तर सांगली येथे २.३ अंशांनी शनिवारच्या तुलनेत कमाल तापमानाचा पारा उतरला होता.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत कुलाबा, सांताक्रूझ, नाशिक, परभणी, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुढच्या काही तासांमध्ये पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.