सातारा जिल्ह्याच्या सुर्याचीवाडीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. देवदर्शनाला जात असताना हा अपघात घडला. गाडी झाडावर आदळळी या झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सातारा येथील सुर्याचीवाडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य सुरु केले होते. मात्र गाडीतील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला आहे. यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.