
मुंबई – काश्मिरी पंडित (Kashmir Pandit) पुन्हा संकटात सापडला आहे. पंडितांचे हत्याकांड आणि पलायन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर आता तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठाम उभा राहील. जे जे शक्य आहे ते सर्व करेल,अशी भूमिका मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांची हत्येचे प्रकरण गेल्या ९ महिन्यांपासून घडत आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील शेकडो भयभीत पंडित आता पलायन करू लागले आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे शिरकाण सुरू आहे. पंडितांना घरवापसीची स्वप्ने दाखवली गेली, मात्र आता त्यांना स्वप्ने दूरच त्यांना आता वेचून मारले जात आहे. ही घटना अस्वस्थ करणारी आहे. याक्षणी या काश्मिरी पंडितांच्या पाठीशी महाराष्ट्र ठाम उभा राहिल, असे मुख्यमंत्री म्हणून वचन देत आहे.
१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रामध्ये विशेष बाब म्हणून शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने कश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.