
50 खोके एकदम ओके म्हणताना ‘शंभर खोके मातोश्री ओके’ तेही दर महिन्याला हे पैसे जात असत, सचिन वाजे पैसे जमा करून मातोश्रीवर पाठवायचा असा गंभीर आरोप बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात मविआ आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. पण अनेक दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे सरकारवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि काही दिवसांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या पार पडल्यानंतर गुलाबराव पाटील बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. त्यावेळी रॅली काढून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.त्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.