पिवळे दात पांढरे करण्याचे कोणते मार्ग आहेत? वाचा…

WhatsApp Group

या जगात असे अनेक लोक आहेत जे नेहमी दात पांढरेशुभ्र करण्याच्या औषधाबद्दल विचारत असतात. चला तर मग आज या प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊयात.

जर तुम्हाला तुमचे पिवळे झालेले दात पांढरे करण्याचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही वस्तूंमुळे तुम्ही तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर करू शकता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला दात स्वच्छ करण्याच्या काही टिप्स आणि सोपे उपाय.

हेही वाचा – शरीरात पाण्याची कमतरता दर्शवणारी ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात!

दात पांढरेशुभ्र करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

  • जर तुमचे दात पिवळे झाले असतील आणि त्यामध्ये जंत असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या दातांची चिंता वाटत असेल. पण आता काळजी करणे थांबवा. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेल 15 ते 20 मिनिटे तोंडात ठेवाव लागेल. त्यानंतर ब्रश करा. काही दिवसांमध्येच तुमचे दात मोत्यांसारखे चमकू लागतील.

 

  • दात पिवळे पडणे हे काहीवेळा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही कितीही उपाय केले तरी तुमचे दात पांढरे होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराच व्हिटॅमिन ‘डी’ आणि कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा समावेश कारावा.

 

  • पिवळे दात पांढरे करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेला हिंगही वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त हिंग पावडर पाण्यात उकळून थंड होऊ द्यावी लागेल. आता दिवसातून दोन वेळा या पाण्याने दात स्वच्छ करावे लागतील. यामुळे तुमचे दात साफ तर होतील सोबत दातदुखीही कमी होण्यास मदत होईल.

 

  • किचनमध्ये ठेवलेला बेकिंग सोडा देखील दातांचा पिवळेपणा दूर करू शकतो. तुम्ही बेकिंग सोडा दातांवर लावू शकता किंवा टूथपेस्टमध्ये मिक्स करूम ब्रश करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मीठही घालू शकता. पिवळे दात पांढरे करण्याचा हा सर्वात लोकप्रिय उपाय आहे.

 

केळी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

हिवाळ्यात या 6 गोष्टी खाल्यास शरीर राहिल उबदार, मिळेल मोठ्या आजारांपासून संरक्षण