Water Cut Off In Mumbai: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 7 आणि 8 जून रोजी या भागामध्ये होणार पाणीकपात

WhatsApp Group

Water Cut Off In Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील एफ दक्षिण विभागात (F South Ward) 7 आणि 8 जून रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरावे (water sparingly ) असं आवाहन करण्यात येत आहे. या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये बीएमसीकडून (BMC) 24 तास पाणीकपात बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात एफ/दक्षिण विभागामध्ये पाणीपुरवठा केला जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवडी बस डेपोसमोर कमी क्षमतेच्या जलवाहिनीला जास्त क्षमतेची जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे मंगळवार 7 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवार 8 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असे 24 तासांकरिता पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या दोन दिवस या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये 7 आणि 8 जून रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.