समांथा प्रभूच्या Oo Antava गाण्यावर विराटने केला जबरदस्त डांस, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

तेलुगू आणि तामिळ सिनेमातील आघाडीची नायिका असलेली संमाथा प्रभूचा Samantha Ruth Prabhu आज वाढदिवस आहे. समांथानं प्रामुख्यानं दक्षिणात्य सिनेमे केले असले तरी तिचे फॅन्स संपूर्ण देशभरात आहेत. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमाने हिंदीमध्येही लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले.

पुष्पामध्ये समांथाचे एक आयटम साँग प्रचंड गाजलं. सध्या कोणत्याही पार्टीमध्ये ते आयटम साँग हमखास वाजवले जाते. आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) लग्नाला 27 एप्रिल रोजी एक महिना झाला. त्यामुळे आरसीबीच्या Royal Challengers Bangalore खेळाडूंसाठीही खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये पुष्पामधील समांथाच्या ‘ऊ अंटावा’ गाण्याची जादू दिसली. या पार्टीमध्ये RCB चे सर्व खेळाडूंनी भारतीय पारंपरिक पोषाख परिधान  केला होता.

आरसीबीचे सर्व खेळाडू आणि स्टाफ या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या पार्टीसाठी त्यांनी खास भारतीय पोषाख घातला होता. आरसीबाीचा माजी कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) या पार्टीत चांगलीच धमाल केली. काळा कुर्ता घालून आलेल्या विराटने पुष्पामधील ‘ऊ अंटावा’ गाण्यावर जोरदार डान्स केला Virat kholi dance on pushpa song. विराटच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विराट या पार्टीमध्ये शाहबाज अहमदसह अन्य संघसहकाऱ्यांबरोबर डान्स करताना दिसला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Faf du plessis (@fafdup)