सोनाक्षी सिन्हा विरोधात वॉरंट जारी, 25 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या Sonakshi Sinha विरोधात मुरादाबाद न्यायालयाने वॉरंट जारी Warrant Issued केले आहे. न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने त्यांना वॉरंटद्वारे समन्स बजावण्यात आले आहे. इवेंटच्या नावाखाली अभिनेत्री आणि तिच्या जोडीदारावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. 25 एप्रिल रोजी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.कटघर येथील शिवपुरी येथील रहिवासी प्रमोद शर्मा यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अभिनेत्रीविरुद्ध वॉरंट जारी केले होते.

शनिवारी सुनावणी करताना, ACJM-4 स्मिता गोस्वामी यांनी गैरहजर राहण्यासाठी जामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणावर 25 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. वकील पीके गोस्वामी आणि आशुतोष त्यागी म्हणतात की, न्यायालयाने सोनाक्षी सिन्हा आणि तिचा सल्लागार अभिषेक सिन्हा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.


अभिनेत्रीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा चार वर्षे जुना आहे. मुरादाबादच्या प्रमोद शर्मा यांच्या आयोजित कार्यक्रमासाठी न आल्याने मनस्ताप सहन करावा लागला. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 ला होणार होता. 22 फेब्रुवारी 2019 ला प्रमोद शर्माच्या तक्रारीवरून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कंपनी अधिकारी अभिषेक सिन्हा, धुर्मिल ठक्कर, मालविका आणि एडगन साकारिया यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शोसाठी साडेतीन लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंटही करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासाअंती पोलिसांनी 20 मे 2020 ला केस प्रथमदर्शनी सत्य असल्याचे लक्षात घेऊन आरोपपत्र दाखल केले. CJM कोर्टात सुनावणी झाल्यानंतर हे प्रकरण ACJM-4 कडे वर्ग करण्यात आले.