हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दुसरीकडे, मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
