
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी दिसतात. पेपर चांगले सोडवल्यानंतरही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येहे फरक पडतो. विद्यार्थ्यांमध्ये निराशा दिसून येते. म्हणूनच निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. तसेच पेपर रिचेकिंग देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावं लागणार आहे.
अशी असेल रिचेकिंग प्रोसेस
- पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.
- यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत.
- यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत.
- यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत.
- यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.
किती असेल शुल्क
- विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळवण्यासाठी चारशे रुपये शुल्क भराव लागणार आहे.
- तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त गन पडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी तीनशे रुपये शुल्क असणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
- 10 जून ते 20 जून – पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी
- 10 जून ते 29 जून – तुमच्या उत्तपत्रिकेच्या प्रिंटसाठी अर्ज करण्यासाठीचा कालावधी.
- 10 जून – पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख.
- 17 जून – विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजतापासून मार्कशीट मिळणार.