
लैंगिक जीवनात नवनवीन पोझिशन्सचा प्रयोग करणे हे नात्याला उत्साह आणि चैतन्य देणारे असते. मात्र, काही पोझिशन्स शारीरिकदृष्ट्या थोड्या क्लिष्ट आणि अवघड असू शकतात. अशा वेळी संभोगाच्या आनंदाऐवजी, वेदना, थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे ‘कम्फर्ट’ आणि ‘कनेक्शन’ या दोन्ही गोष्टी जपण्यासाठी काही आवश्यक बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
१. शरीराची तयारी आवश्यक
अवघड पोझिशन्स करताना शरीर लवचिक असणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी नियमित स्ट्रेचिंग, योग किंवा हलका व्यायाम केला असल्यास पोझिशन्स सहज साधता येतात. पाठीचा कणा, कंबर आणि पायांच्या स्नायूंना योग्य ताण देण्याची सवय असली पाहिजे.
२. योग्य गादी आणि पृष्ठभाग वापरा
काही पोझिशन्ससाठी बेडचा सपोर्ट कमी वाटतो. अशावेळी फोल्डिंग पिलोज, सॉफ्ट कुशन्स किंवा फर्म गाद्यांचा वापर केल्यास शरीराला आधार मिळतो आणि अस्वस्थता कमी होते.
३. ल्युब्रिकेशनचा वापर करा
अवघड पोझिशन्समध्ये घर्षण वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नैसर्गिक ओलसरता कमी असल्यास पेन किंवा खाज सुटण्यासारख्या समस्या होऊ शकतात. वॉटर-बेस्ड ल्युब्रिकेशन वापरणे सुरक्षित आणि आरामदायी ठरते.
४. श्वासावर लक्ष द्या
संभोग दरम्यान खोल आणि नियंत्रित श्वास घेतल्यास तणाव कमी होतो आणि अधिक सुसंगत हालचाली शक्य होतात. हे विशेषतः क्लिष्ट पोझिशन्समध्ये उपयोगी ठरते.
५. संवाद ठेवा
जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे हीच यशस्वी आणि समाधानी संभोगाची गुरुकिल्ली आहे. पोझिशनमध्ये अस्वस्थता जाणवत असल्यास लगेच सांगावे. संमती आणि सुसंवाद असल्यास दोघांनाही अधिक आत्मविश्वास आणि आनंद मिळतो.
६. काळजी घ्या, स्पर्धा नको
कधीकधी पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी शरीराच्या क्षमतेच्या पलिकडची पोझिशन ट्राय केली जाते. पण यातून स्नायू दुखणे, मसल स्ट्रेन किंवा अंग दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखूनच कोणतीही पोझिशन निवडा.
७. संभोगापूर्व आणि नंतरची काळजी
अवघड पोझिशननंतर थोडा वेळ विश्रांती घ्या. कोमट पाणी प्यावे, स्ट्रेचिंग करावे किंवा एकमेकांना हलकी मसाज द्यावी. यामुळे शरीर सैल पडते आणि नात्यातील जिव्हाळाही वाढतो.
अवघड पोझिशन्समधून अधिक आनंद घेण्यासाठी केवळ शारीरिक ताकद नाही, तर परस्पर समज, संवाद, आणि योग्य तयारीचीही गरज असते. सेक्स ही केवळ शारीरिक क्रिया नसून, एकमेकांशी जोडले जाण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही पोझिशनचा आनंद घेताना “आराम + आनंद + आपुलकी” हे तत्त्व लक्षात ठेवणे आवश्यक आहे.