T20 WC: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानिंदू हसरंगाने घेतली हॅट्ट्रिक

WhatsApp Group

शारजाह – आयसीसी T20 विश्वचषकात शनिवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक साजरी केली आहे. या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली आहे.


हसरंगा हा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारा श्रीलंकेचा पाचवा आणि T20 विश्वचषकातील तिसरा खेळाडू ठरला. हसरंगाच्या आधी, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीने 2007 च्या T20 विश्वचषकात तर आयर्लंडच्या कर्टिस कॅम्पफरने याच विश्वचषकात हॅटट्रिक घेतली होती.