आशिया चषक 2022 पूर्वी BCCI ची मोठी घोषणा, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी VVS Laxman यांची नियुक्ती

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून VVS लक्ष्मण यांची नियुक्ती केली आहे. लक्ष्मण सध्या एनसीएसचे अध्यक्ष आहेत. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी लक्ष्मण टीम इंडियासोबत जाणार आहेत. राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे लक्ष्मण संघासोबत जाईल अशी अटकळ बांधली जात होती.

लक्ष्मणही टीम इंडियासोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेले होते. भारताने येथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मणकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. भारतीय संघ 23 ऑगस्टला यूएईला रवाना झाला आहे. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते.

बीसीसीआयने बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. कोविडचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर द्रविड संघात सामील होणार आहेत, असे बोर्डाने म्हटले आहे.