Gram Panchayat Election: राज्यातील 1165 सरपंचाच्या भवितव्यासाठी आज होणार मतदान, उद्या निकाल

WhatsApp Group

Gram Panchayat Election 2022: ग्रामीण महाराष्ट्रासाठी (Rural Maharashtra) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणा आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान करता येणार आहे. तर मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्या आणि पॅनेल ताकतीने उतरल्या असून गाव कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच सोमवारी (17 ऑक्टोबर) लागणार आहे.