यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

WhatsApp Group

उत्तर प्रदेश विधानसभा Uttar Pradesh निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी ९ जिल्ह्यांतील ५९ जागांवर (चौथ्या टप्प्यातील मतदान) मतदान होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, फतेहपूर, बांदा आणि उन्नावमधील ५९ जागांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

या टप्प्यात मोदी सरकारच्या ४ मंत्र्यांसह योगी सरकारच्या अनेक मंत्र्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि शहरी गृहनिर्माण मंत्री कौशल किशोर यांचा समावेश आहे, ज्यांच्या लोकसभा मतदारसंघात आज मतदान होणार आहे.

यापूर्वी यूपीमध्ये झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात ५९ विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते आहे. त्यामध्ये हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फारुखाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपूर देहात, कानपूर नगर, जालौन, झांसी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा या जिल्ह्यांचा समावेश होता.