टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे जी यापूर्वी कोणताही भारतीय फलंदाज करू शकला नव्हता.
विराट कोहलीने इतिहास रचला
विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 6 धावा करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये (इंटरनॅशनल + डोमेस्टिक टी-20 + फ्रँचायझी लीग) 12000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी केवळ 5 फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावांचा आकडा पार करू शकले होते. त्याचबरोबर भारताच्या कोणत्याही फलंदाजाने हा पराक्रम यापूर्वी केला नव्हता.
The first 🇮🇳 batter to score 12,000 T20 runs 🐐👑
Another milestone for Virat Kohli 🌟 #CSKvRCB #IPL2024 pic.twitter.com/3dGlJXb9Nz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 22, 2024
टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
- ख्रिस गेल – 14,562 धावा
- शोएब मलिक – 13360 धावा
- किरॉन पोलार्ड – 12900 धावा
- ॲलेक्स हेल्स – 12319 धावा
- डेव्हिड वॉर्नर – 12065 धावा
- विराट कोहली -12000+ धावा
सर्वात कमी डावात 12000 टी-20 धावा करणारे फलंदाज
- 345 डाव – ख्रिस गेल
- 360 डाव – विराट कोहली
- 368 डाव – डेव्हिड वॉर्नर
- 432 डाव – ॲलेक्स हेल्स
- 451 डाव - शोएब मलिक
- 550 डाव – किरॉन पोलार्ड
CSK विरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या
विराट कोहलीने या डावात 15 धावा पूर्ण करताच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 1000 धावाही पूर्ण केल्या. याआधी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फक्त शिखर धवनला 1000 धावा करता आल्या होत्या.