Virat Kohli ने 4 वर्षांनंतर IPLमध्ये ठोकले शतक, गेलच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

0
WhatsApp Group

IPL 2023 मध्ये विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला जुना अवतार जगाला दाखवला आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासातील सहावे शतक पूर्ण केले आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याने आयपीएलमध्ये शतक झळकावले. तत्पूर्वी, टी-20, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये शानदार शतक झळकावून विराटने आयपीएलमध्येही शतकाचा दुष्काळ संपवला. या खेळीत त्याने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ख्रिस गेलच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने 63 चेंडूत 100 धावा केल्या.

यासह विराट कोहलीने IPL 2023 मध्ये 500 धावांचा टप्पा पार केला. त्याने या मोसमातील चौथी शतकी भागीदारीही त्याचा साथीदार फाफ डू प्लेसिससोबत शेअर केली. त्याने आपले सहावे आयपीएल शतक झळकावले आणि आता लीगमधील सर्वाधिक शतके करणाऱ्या ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. त्याने या मोसमात 13 डावांत 6 अर्धशतके आणि एका शतकासह 538 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने यापूर्वी 2016 मध्ये चार शतके झळकावली होती आणि 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
विराट कोहली – 6
ख्रिस गेल – 6
जोस बटलर – 5
केएल राहुल – 4
डेव्हिड वॉर्नर – 4
शेन वॉटसन – 4

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या. यादरम्यान हेनरिक क्लासेनने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. सामन्याच्या दुसऱ्या डावात आरसीबीकडे मोठे लक्ष्य होते. पण सुरुवातीपासूनच विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने सामन्यावर पकड ठेवली आणि आरसीबीने 19.2 षटकात 2 गडी गमावून 187 धावा केल्या आणि सामना 8 विकेटने जिंकला. यादरम्यान विराट कोहलीनेही शतक झळकावले. विराटने 63 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.