Virat Kohli : अनुष्कामुळे मी आज इथे उभा आहे… 71व्या शतकानंतर कोहलीची प्रतिक्रिया

WhatsApp Group

आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून भारत भलेही बाहेर पडला असेल, पण भारताला जुना विराट परत मिळाला आहे. ‘किंग कोहली’ फॉर्ममध्ये आला आहे. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने शानदार शतक झळकावले. संपूर्ण देश या शतकाची 1021 दिवस वाट पाहत होता. कोहलीने यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर प्रत्येक डावासह कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा अधिक लांबत गेली. मात्र गुरुवारी आज 8 सप्टेंबर रोजी ही प्रतीक्षा संपली. फरीद अहमदच्या चेंडूवर षटकार ठोकताच कोहलीने ही प्रतीक्षा संपवली. कोहलीने हे शतक पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाला समर्पित केले.

या खेळीनंतर अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट म्हणाला, ‘गेली अडीच वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली. मी या वर्षी नोव्हेंबरमध्ये 34 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे ते शतक उत्साहाने करणे हा आता इतिहासाचा विषय झाला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये कोहलीचे हे पहिले शतक आहे. टीम इंडियाचा हा माजी कर्णधार म्हणाला, ‘खरं तर मला खूप आश्चर्य वाटलं. या फॉरमॅटमध्ये मला शतकाची आशा होती. पण ते घडले याचा मला आनंद आहे.

आशिया चषकापूर्वी कोहलीने दीर्घ विश्रांती घेतली होती. त्यानंतर परतताना त्याने या स्पर्धेतील पाच डावांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले. तो म्हणाला, ‘मी परत आलो तेव्हा संघाने माझे मनापासून स्वागत केले. खूप मदत मला संघाने केली. मला माझा खेळ ठरवायला वेळ मिळाला. असं विराट म्हणाला.

कोहलीच्या फॉर्मवर बरीच टीका झाली होती. संघातील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यावर विराट म्हणाला बाहेर अनेक गोष्टी घडत होत्या पण मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. कोहली म्हणाला पुढे म्हणाला, ‘मी आज इथे उभा आहे त्यामागे एक व्यक्ती आहे ती म्हणजे अनुष्का. हे शतक तिच्यासाठी आणि आमची मुलगी वामिकासाठी आहे. जेव्हा तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असते ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता, सर्व शेअर करू शकता आणि ती व्यक्ती आपल्याला चांगली ओळखते, समजून घेते तेव्हा खूप फायदा होतो. आणि अनुष्का माझ्यासाठी अशीच आहे…’ असं विराट म्हणाला.