विराट कोहलीच्या फ्लॉप शोमुळे चाहते निराश, मीम्सद्वारे व्यक्त करतायत संताप

WhatsApp Group

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. या महान खेळाडूच्या फॉर्ममध्ये परतण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र प्रत्येक डावानंतर विराट आणि त्याच्या चाहत्यांच्या हाती फक्त निराशाच देत आहे. आज म्हणजेच 17 जुलै रोजी मँचेस्टरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली अवघ्या 17 धावा करून बाद झाला.

मालिकेतील निर्णायक सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने भारताला 260 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या पॉवरप्लेमध्येच आपल्या तीन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. त्यापैकी सर्वात निराशाजनक ठरली ती विराट कोहलीची विकेट. या डावात विराट सेट झाल्यानंतरही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. त्याला पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहून चाहते नाराज झाले असून त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.