विराट कोहली ऑन फायर! ठोकलं आयपीएल 2024 मधील पहिलं शतक

WhatsApp Group

Virat Kohli Century: आयपीएल 2024 चा 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आरआरचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघ प्रथम फलंदाजीला आला आणि त्यांनी शानदार फलंदाजी सुरू केली. यादरम्यान विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहली 72 चेंडूत 113 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार मारले.

विराटने अवघ्या 67 चेंडूत शतक झळकावले. विराट कोहलीने येताच वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात एक मोठा विक्रम केला असून आयपीएलच्या इतिहासात त्याने 7500 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासातील 8 वे शतक ठोकले आहे.

विराट कोहली-फॅफ डु प्लेसिस चमकले, मॅक्सवेल पुन्हा फ्लॉप…

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली. आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 14 षटकांत 125 धावांची भागीदारी केली. फाफ डू प्लेसिस 33 चेंडूत 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, ग्लेन मॅक्सवेलचा पुन्हा फ्लॉप ठरला. ग्लेन मॅक्सवेल फक्त 1 धाव काढून बाद झाला.

राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. युजवेंद्र चहलने 4 षटकात 34 धावा देत 2 फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय नांद्रे बर्जरला 1 यश मिळाले.

विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द 

कोहलीने 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. तो या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 242 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 38.28 च्या सरासरीने आणि 130.63 च्या स्ट्राइक रेटने 7,579 धावा केल्या आहेत. त्याने 8 शतके आणि 52 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 113 धावा आहे. तो त्याच्या कारकिर्दीत 36 वेळा नाबाद राहिला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीची कामगिरी 

कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 381 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 41 पेक्षा जास्त सरासरीने 12,310 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 9 शतके आणि 94 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 122* धावा आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूने 117 सामन्यांच्या 109 डावांमध्ये 51.75 च्या सरासरीने आणि 138.15 च्या स्ट्राइक रेटने 4,037 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 1 शतक आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत.

आयपीएलमध्ये 7,500 धावा करणारा कोहली पहिला खेळाडू 

कोहलीने आपल्या खेळीदरम्यान आयपीएलमध्ये एक मोठा विक्रमही केला. त्याने आयपीएलमध्ये 7,500 धावाही पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने 7000 धावा केल्या नाहीत. पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) सध्याचा कर्णधार शिखर धवन (6,683) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. शेवटच्या सामन्यात, एकाच मैदानावर (एम चिन्नास्वामी स्टेडियम) 100 टी-20 सामने खेळणारा कोहली पहिला भारतीय ठरला.