Video: विराट कोहलीची सीएसकेच्या ‘या’ खेळाडूशी बाचाबाची, धक्का दिला आणि बॅटने मारले…

WhatsApp Group

RCB vs CSK: भारताचा महान फलंदाज विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर यांच्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहली धावत असताना दीपक चहर कोहलीच्या समोर आला, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोहली पळत होता आणि दीपक चहर विराटच्या पुढे जात होता. तेव्हा विराटने दीपक चहरला ढकलले आणि हलक्या हाताने बॅटने मारले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

काय आहे संपूर्ण प्रकरण
चेपॉक मैदानावर हा सामना आरसीबी आणि चेन्नई यांच्यात खेळला जात होता. या सामन्यादरम्यान दीपक चहर गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. दोन्ही खेळाडूंमध्ये हा केवळ विनोद होता. कोहलीने मस्करी करत आधी दीपक चहरला धक्का दिला आणि मागून हलकेच बॅट मारली. यानंतर दीपक चहर आणि विराट कोहली दोघेही हसायला लागले.

चेपॉकमध्ये आरसीबीला आठव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2008 नंतर बंगळुरूचा संघ अद्याप या मैदानावर जिंकू शकलेला नाही. बेंगळुरू आणि चेन्नई यांच्यात या मैदानावर एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी बेंगळुरूने केवळ एक सामना जिंकला आहे, तर चेन्नई संघाने 8 सामने जिंकले आहेत. बेंगळुरूला या मैदानावर 16 वर्षांपासून एकही सामना जिंकता आलेला नाही. बेंगळुरू संघासाठी हा अतिशय लाजिरवाणा विक्रम आहे.

आरसीबीचा दारुण पराभव 
चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी बंगळुरूसाठी अप्रतिम खेळी खेळली. आरसीबी संघ संकटात सापडला होता, अशा परिस्थितीत रावतने 48 धावांची, तर कार्तिकने 38 धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंच्या या खेळीमुळे आरसीबीला १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, सीएसकेने हे लक्ष्य सहज गाठले आणि विजयासह स्पर्धेची सुरुवात केली.