टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराट आज खेळणार अखेरचा सामना!

WhatsApp Group

आयसीसी T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाचं आव्हान ‘सुपर 12’ फेरीमध्ये संपलं आहे. आज भारतीय संघाचा सामना नामिबियाशी होणार आहे. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर तर रवी शास्त्री यांचाही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही हा शेवटचा सामना आहे. या दोघांनी मिळून आजवर भारतीय संघाला अनेक चागंले क्षण दिले आहेत. त्यामुळे या जोडगोळीसाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे.

कर्णधार म्हणून विराट कोहलीने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमधील मोठ्या सामन्यांमध्ये त्याच्या कर्णधारपदाची चमक अनेक वेळा फिकी पडताना दिसली. विराटने आतापर्यंत 65 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये भारताने 38 सामने जिंकले आहेत जो भारतासाठी एक मोठा विक्रम आहे.

विराट कोहली हा एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचा चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने आतापर्यंत 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये भारताने 65 सामने जिंकले आहेत. याशिवाय विराट कोहलीने आतापर्यंत 49 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे.


विराट कोहलीच्या जागी कोण असेल भारताचा नवीन कर्णधार ?

विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताचा नवीन कर्णधार कोण असेल यावर जोरदार चर्चा चालू आहे. विराटनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहित शर्माचं टी-20 चा कर्णधार असेल हे जवळ जवळ स्पष्ट झाले असून त्याची घोषणा विश्वचषकानंतरच केली जाईल अशी माहिती काही सुत्रांनी दिली आहे. रोहित सध्या भारताच्या वनडे आणि टी20 संघाचा उपकर्णधारही आहे. रोहित कर्णधार झाल्यास उपकर्णधारपदासाठी केएल राहुल प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.