मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. श्रीलंकेचा संघ पहिल्यांदा टी20 मालिका खेळणार असून, त्यामध्ये तीन सामने होणार आहेत Sri Lanka’s tour of India. या टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये होणार आहे.
3 सामन्यांच्या टी२० मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा भाग असेल. BCCI ने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, लखनौ आता पहिला T20 सामना आयोजित करेल, तर पुढील धर्मशाळा येथे दोन सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना 4 ते 8 मार्च दरम्यान मोहालीत, तर दुसरा कसोटी सामना 12 ते 16 मार्च दरम्यान बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीलाठी श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका खूपच खास असणार आहे. कारण 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा विराट कोहलीसाठी त्याचा 100 वा कसोटी सामना असणार आहे Virat Kohli 100th Test match . त्यामुळे या सामन्याची वाट विराटसह भारतातील संर्व क्रिकेट चाहते पाहत आहेत.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे
- 24 फेब्रुवारी – पहिला टी20 सामना, लखनऊ
- 26 फेब्रुवारी – दुसरा टी20 सामना, धर्मशाळा
- 27 फेब्रुवारी – तिसरा T20 सामना, धर्मशाळा
- 4-8मार्च – पहिली कसोटी, मोहाली
- 12-16 मार्च – दुसरी कसोटी (डे-नाईट), बंगळुरू
India vs Sri Lanka 3 T20i & 2 Test Matches Full Schedule:#CricketTwitter #INDvsSL #IPL2022 pic.twitter.com/Hvknt4jgKE
— MY Cricket Production (@MCPOriginal) February 15, 2022