Asia Cup 2022: विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच रचणार इतिहास, असे करणारा बनणार पहिला आशियाई

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 2022 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचेही आशिया कपसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता किंग कोहली 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

किंग कोहली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तो 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कोहली हा भारताचा दुसरा खेळाडू असेल. यापूर्वी रोहित शर्माने हा पराक्रम केला आहे. हिटमॅनने आतापर्यंत 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

किंग कोहली पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा आशियातील पहिला खेळाडू बनेल. याआधी फक्त न्यूझीलंडचा रॉस टेलर हा पराक्रम करू शकला होता. टेलरने सर्व फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.