विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा!

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने ट्विटरवरून ही घोषणा केली. त्याने 2014 मध्ये भारताचं कसोटी कर्णधारपद स्वीकारलं होतं.

विराट कोहलीने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, गेली सात वर्षे सातत्याने मेहनत आणि प्रयत्नांमुळे संघाला योग्य दिशेने मी नेले आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही. पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, माझ्यासाठी कसोटी कर्णधारपद संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. असं विराटने म्हटलं आहे.

बीसीसीआयने विराट कोहलीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या या ट्विटनंतर काही वेळातच बीसीसीआयचे ट्विट आले, ज्यामध्ये बोर्डाने विराटला कसोटी कर्णधार म्हणून वाटचाल केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. भारतीय कसोटी कर्णधार म्हणून 40 सामने जिंकण्याच्या विक्रमाबद्दल बीसीसीआयने विराट कोहलीचे अभिनंदन केले.

कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम

सामने  – 68

विजय – 40

हार – 17

विजयाची टक्केवारी – 58.82

विराट कोहलीचे काही महत्त्वाचे विक्रम

ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका जिंकवणारा पहिला भारतीय कर्णधार

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 2 कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार

इंग्लंडच्या भूमीवर ३ कसोटी जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार

कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा

विराट कोहली, 68 कसोटी – 5864 धावाएमएस धोनी, 60 कसोटी – 3454 धावा
सुनील गावस्कर, 47 कसोटी – 3449 धावा
मोहम्मद. अझरुद्दीन, 47 कसोटी – 2856 धावा
सौरव गांगुली- 49 कसोटी-2561 धावा