IND vs AUS: विराट कोहलीने 1206 दिवसांनंतर झळकावले 28वे कसोटी शतक

WhatsApp Group

Virat Kohli Hit Century Against Australia: विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र तिसऱ्या कसोटीत शतक झळकावून त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

विराट कोहलीने सुरुवातीपासूनच संयमाने फलंदाजी केली. कोहलीने 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील त्याचे हे 28 वे शतक आहे. त्याच्यामुळेच टीम इंडिया चौथ्या कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचताना दिसत आहे.

कारकिर्दीतील 75 वे शतक

गेल्या दशकभरापासून विराट कोहली टीम इंडियाच्या फलंदाजीच्या आक्रमणाचा आधार राहिला आहे. त्याने टीम इंडियाला अनेक कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी एकूण 75 शतके झळकावली आहेत.

2011 मध्ये केले पदार्पण 
विराट कोहलीने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्याने भारतासाठी 107 कसोटी सामन्यांमध्ये 8230 धावा, 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12809 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 115 टी-20 सामन्यांमध्ये 4008 धावा केल्या आहेत.