बाबर आझमच्या ट्विटला विराट कोहलीने दिले उत्तर, जाणून घ्या काय म्हणाला विराट

WhatsApp Group

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या खूप चर्चेत आहे. बाबरने विराट कोहलीच्या समर्थनार्थ एक हृदयस्पर्शी पोस्ट केली होती, ज्यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. एवढेच नाही तर बाबरने पत्रकार परिषदेत कोहलीच्या कौतुकाचेही पूल बांधले होते. आता विराट कोहलीने बाबर आझमच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली अवघ्या 16 धावांवर बाद झाला तेव्हा त्याच्यावर टीकेची झोड उठली. संघातील त्याच्या स्थानावरही प्रश्न उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत बाबर आझमने कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट करून त्याला प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्याने कोहलीचे कौतुकही केले होते.

बाबरच्या ट्विटला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘धन्यवाद. चमकत राहा आणि पुढे जात रहा. ऑल द बेस्ट. असं ट्वीट विराटने केले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही एका टीव्ही शोमध्ये म्हणाला होता की, बाबर आझमच्या ट्विटला विराट कोहलीने उत्तर द्यावे. राजकारणी जे करू शकत नाहीत ते खेळ करू शकतो, असे आफ्रिदी म्हणाला होता. खेळामुळे दोन्ही देश जवळ येऊ शकतात, असंही तो म्हणाला होता.