IPL 2023 RCB vs KKR: विराट कोहलीने केला ‘हा’ विश्वविक्रम!

WhatsApp Group

IPL 2023 च्या 36 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासमोर आहे. या सामन्यात आरसीबीचे कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 200 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली. विराटने या सामन्यात 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. विराटने या सामन्यात बाद होण्यापूर्वी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

विराटने इतिहास रचला
विराटने आपल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरविरुद्ध मोठा विक्रम केला. खरंतर विराट आता याच स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विराटच्या 3000 पेक्षा जास्त टी-20 धावा आहेत. या बाबतीत आता जगातील कोणताही फलंदाज विराटच्या पुढे नाही. विराटने या बाबतीत बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमला मागे टाकले आहे.

मुशफिकुरने मीरपूरमध्ये 2989 टी-20 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा महमुदुल्ला आहे, ज्याने मीरपूरमध्येच 2813 टी-20 धावा केल्या आहेत. या यादीत चौथे नाव अॅलेक्स हेल्सचे आहे. हेल्सने नॉटिंगहॅममध्ये 2749 धावा केल्या आहेत.

केकेआरचे फलंदाज चमकले
या सामन्यात केकेआरने अप्रतिम फलंदाजी करत 200 धावा फलकावर लावल्या. केकेआरच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. जेसन रॉयने (56) डावाच्या पहिल्याच षटकापासून जोरदार फटकेबाजी केली. एन जमदीशननेही 27 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने 31 आणि नितीश राणाने 41 धावा केल्या. याशिवाय रिंकू सिंगने अखेरीस 18 धावांची जलद खेळी केली.