”मी त्याला कॉल केला, तर तो…”, कोहलीने केला मोठा खुलासा

WhatsApp Group

विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विराटने पदार्पण केले. दोघांचे नाते कोणापासून लपलेले नाही. आता विराटने त्याच्या आयपीएल टीम आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल मोठे खुलासे केले आहेत. त्याचबरोबर त्याने धोनीबद्दल एक मोठी गोष्टही सांगितली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

विराट कोहली म्हणाला की, पत्नी अनुष्का शर्मा, संपूर्ण कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, महेंद्रसिंग धोनी ही एकमेव व्यक्ती होती जी वाईट काळात माझी ताकद बनली. कोहलीने 2008 ते 2019 अशी 11 वर्षे धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली. कोहली म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीला ओळखणे हा बहुमान आहे, कारण कोणीतरी तुमच्यापेक्षा खूप अनुभवी आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून शिकायला मिळते. आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. कोहली पुढे म्हणाला की, धोनीशी संपर्क साधणे खूप कठीण आहे. जर मी त्याला कॉल केला, तर तो उचलणार नाही अशी 99 टक्के शक्यता आहे कारण तो त्याचा फोन पाहत नाही. मी त्याच्याशी दोनदा फोनवर बोललो आहे.

हा सामना महत्त्वाचा असल्याचे सांगितले
2012 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत पराभव पत्करला होता. तिसरा कसोटी सामना पर्थमध्ये खेळवला जाणार होता. पर्थची खेळपट्टी खूप अवघड होती कारण तिथे भरपूर उसळी होती. त्यावेळी मला माहित होते की या कसोटी सामन्यात मी चांगली कामगिरी केली नाही तर मी संघात टिकू शकणार नाही आणि मला चौथी कसोटी खेळायला मिळणार नाही. त्यावेळी मी संघातील सर्वात कमी अनुभवी खेळाडू होतो.

विराट कोहली हा गेल्या दशकात टीम इंडियासाठी सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या फलंदाजीने भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाज म्हणून उदयास आला. त्याने टीम इंडियासाठी 106 कसोटी सामन्यांमध्ये 8195 धावा, 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12809 धावा आणि 115 टी-20 सामन्यांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण 74 शतके आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा कोहली हा भारताचा एकमेव खेळाडू आहे.