विराट कोहली पुन्हा चर्चेत! जर्मन मॉडेल लिझलॅझचा फोटो केला ‘लाईक’; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहा कोण आहे ही तरुणी?
भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहली मैदानात आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत असला, तरी सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. विराटने एका जर्मन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो लाईक केल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोबाबत असाच प्रकार घडला होता, ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय? जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझ(LizLaz) हिने ३० जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. विराट कोहली या इन्फ्लुएन्सरला फॉलो करत नसतानाही, त्याच्या अधिकृत अकाउंटवरून या फोटोला ‘लाईक’ मिळाल्याचे चाहत्यांच्या निदर्शनास आले. हे पाहताच सोशल मीडियावर स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आणि चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली. काही चाहत्यांनी “विराट भाई, आता पुन्हा अल्गोरिदमवर मोठा पॅराग्राफ लिहावा लागेल,” अशा शब्दांत टोमणे मारले आहेत.
कोण आहे ही लिझलॅझ? लिझलाझ ही एक प्रसिद्ध जर्मन सोशल मीडिया क्रिएटर, ट्रॅव्हल व्लॉगर आणि गायिका आहे. तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी:
-
विराटची चाहती: लिझलाझ स्वतःला विराट कोहलीची मोठी फॅन मानते. अनेक मुलाखतींमध्ये तिने विराट आपला आवडता क्रिकेटपटू असल्याचे सांगितले आहे.
-
आरसीबी कनेक्शन: तिने अनेकवेळा आरसीबीची (RCB) जर्सी घालून व्हिडिओ आणि रील्स बनवले आहेत.
-
भारत प्रेम: तिला भारतीय संस्कृती आणि स्ट्रीट फूडची प्रचंड आवड आहे. तिने मुंबई, बेंगळुरू, गोवा आणि दिल्ली या शहरांचे ट्रॅव्हल व्लॉग्स बनवले आहेत, ज्यामुळे भारतात तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
-
सोशल मीडिया: इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अल्गोरिदम की चूक? गेल्या वर्षी जेव्हा विराटने अवनीत कौरचा फोटो लाईक केला होता, तेव्हा त्याने स्पष्टीकरण दिले होते की, फीड स्क्रोल करताना इन्स्टाग्राम अल्गोरिदममुळे चुकून तो इंटरॅक्शन झाला होता. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने, विराट पुन्हा एकदा “फीड क्लीन करत होता का?” असा सवाल नेटकरी विचारत आहेत. यावर अद्याप विराट किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
