Virat Kohli: विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने एकट्याने भारतीय संघाला अनेक कठीण प्रसंगातून सोडवले आहे. जेव्हा तो मैदानावर पाऊल ठेवतो तेव्हा मैदानात वेगळेच वातावरण असते. त्याला चेस मास्टर म्हणतात. मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना तो वेगळ्याच लयीत असल्याचे दिसून येते. त्याने बांगलादेशविरुद्ध 103 धावांची तुफानी खेळी खेळली आणि महेला जयवर्धने आणि सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकून अनेक मोठे विक्रम रचले.
बांगलादेशने भारताला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या दोन्ही खेळाडूंनी स्फोटक शैलीत फलंदाजी केली. पण रोहित 48 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शुभमन गिलही 53 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने धावा काढण्याची जबाबदारी घेतली. 77 धावा केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26000 धावा पूर्ण केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26 हजार धावा पूर्ण केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. 26 हजार धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीने 567 डाव खेळले असून सचिनने 600 डाव खेळले आहेत.
हेही वाचा – उर्वशी रौतेलाला चोराने पाठवला ईमेल, आयफोनच्या बदल्यात केली ‘ही’ मागणी
Another run-chase
Another fifty
Another milestoneKing Kohli reaches 𝟮𝟲,𝟬𝟬𝟬 𝗶𝗻𝘁𝗲𝗿𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗿𝘂𝗻𝘀! 👑#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/DMkjgc88WT
— BCCI (@BCCI) October 19, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26000 धावा पूर्ण करणारे खेळाडू
- विराट कोहली- 567 डाव
- सचिन तेंडुलकर- 600 डाव
- रिकी पाँटिंग- 624 डाव
- कुमार संगाकर- 625 डाव
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- 34357 धावा- सचिन तेंडुलकर
- 28016 धावा- कुमार संगकारा
- 27483 धावा- रिकी पाँटिंग
- 26000* धावा – विराट कोहली
- 25957 धावा- महेला जयवर्धने
हेही वाचा – PM Kisan Yojana: सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीची भेट, खात्यात जमा होतील 2000 रुपये
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने 34357 धावा केल्या आहेत. कुमार संगकारा 28016 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रिकी पाँटिंग 27483 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय संघाने सामना जिंकला
बांगलादेशने भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 257 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज गाठले. भारताकडून रोहित शर्माने 48 आणि शुभमन गिलने 55 धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याने 103 धावा केल्या.