Virat Kohli Wicket: पाहा, तब्बल 7 वर्षांनी विराट कोहलीला मिळाली विकेट

WhatsApp Group

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने फलंदाजीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. या सगळ्यामध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही करून दाखवले आहे जे तो गेल्या 7 वर्षांपासून करू शकला नाही.

विराटने 7 वर्षांनंतर केलं असं काही : आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जाणारा विराट कोहली काही प्रसंगी गोलंदाजी करतानाही दिसला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी केली होती. यादरम्यान त्याने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सची विकेट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटची ही 9वी विकेट आहे. विशेष म्हणजे त्याने 7 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतली आहे. याआधी विराटने 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विकेट घेतली होती.

गोलंदाज म्हणून विराटची आकडेवारी : विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 विकेट्स घेतल्या आहेत, त्यापैकी 5 विकेट एकदिवसीय आणि 4 विकेट टी-20 फॉरमॅटमध्ये आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. विराट कोहलीने इंग्लंडच्या 4 खेळाडूंना आपला बळी बनवले आहे. त्याने कारकिर्दीतील पहिले चार विकेट फक्त इंग्लंडविरुद्धच घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

याआधी विराट कोहलीनेही या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. विराटने 56 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. यादरम्यान विराटने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीने 50किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळण्याची ही 7वी वेळ होती. याआधी या विश्वचषकात फक्त सचिन तेंडुलकर आणि शकीब अल हसन 7 वेळा 50+ धावांची इनिंग खेळू शकले.