
Virat Kohli Covid-19: भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी टीम इंडिया 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूही लीसेस्टरला पोहोचले आहेत, मात्र या सामन्यावर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती आहे.
यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात लंडनमध्ये पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता विराट कोहलीला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.