भरमैदानात राडा, रागाच्या भरात विराट कोहली अंपायरवर जवळ गेला आणि… पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

 Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम खेळताना 222 धावांची मोठी मजल मारली होती. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस आरसीबीसाठी सलामीला आले तेव्हा त्यांनी संघाला चांगली सुरुवात केली. मात्र विराटच्या बंगळुरू संघाचा या सामन्यात पराभव झाला. मात्र तिसऱ्या षटकात विराट कोहली बाद झाल्यावर मोठा वाद निर्माण झाला.

वादग्रस्तरित्या बाद दिल्याने विराटला संताप अनावर झाला. त्यानंतर विराट जाऊन थेट फिल्ड अंपायरशी भिडला. विराटने या निर्णयाबाबत पंचांकडे नाराजी व्यक्त केली आणि आपला राग व्यक्त केला. मात्र आऊट दिल्यामुळे विराटला नाईलाजाने मैदानाबाहेर जावं लागंल.

आरसीबीकडून फाफ कॅप्टन डु प्लेसीस आणि विराट कोहली ही सलामी जोडी 223 धावांचं पाठलाग करायला मैदानात उतरली होती. या दोघांनी आक्रमक सुरुवात केली. या सलामी जोडीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये नाबाद 27 धावा जोडल्या. त्यानंतर हर्षित राणा आरसीबीच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. विराट कोहली स्ट्राईक एंडवर होता. हर्षितने टाकलेला पहिला बॉल विराटने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षितने आपल्याच बॉलिंगवर विराटचा कॅच घेतला. अंपायरने विराटला बाद घोषित केलं. हर्षितने विकाटला टाकलेला पहिला बॉल कंबरेवर होता. त्यामुळे विराटने अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देत रीव्हीव्यू घेतला. मात्र थर्ड अंपायरनेही फिल्ड अंपायरचा निर्णय योग्य ठरवला आणि विराट बाद असल्याचंच सांगितलं.