विराट कोहली पुन्हा फेल! स्वस्तात बाद झाल्यावर असा काढला राग

WhatsApp Group

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली, तर माजी कर्णधार विराट कोहलीही काही कमाल दाखवू शकला नाही Virat Kohli fails again .

विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंज देत असून, मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याला फारशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या नादात आऊट झाला तेव्हा त्याने आपला राग स्वतःवरच काढला.


रोहित शर्मा आणि ऋषभ पंत बाद झाल्यावर विराट कोहली चांगली खेळी खेळेल अशी अपेक्षा होती. पण ओडियन स्मिथच्या चेंडूवर विराट बाद झाला. विकेट गमावल्यानंतर विराट कोहली पॅव्हेलियनच्या दिशेने परत जात होता, त्यावेळी त्याचा राग दिसून आला आणि तो जोरात ओरडला.


वेस्ट इंडिजविरुद्धत्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 30 चेंडू खेळले आणि त्याला केवळ 18 धावा करता आल्या. विराटने आपल्या खेळीत 3 चौकार मारले.

हेही वाचा

हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी

पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत