दादा VS विराट: मैदानाबाहेरही विराटची शानदार टोलेबाजी!
मुंबई – आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा वनडे आणि टी२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक तुफानी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनजे मालिकेत आपण खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले. तसेच आपले विद्यमान कर्णधार रोहित शर्माशी कोणत्याच प्रकारचे वाद नसल्याचेही स्पष्ट केले आहे. आपल्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याचा घटनाक्रमही विराटने यावेळी सांगितला, मात्र या त्रकार परिषद त्याने काही अशी विधाने केली आहेत की BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना अडचणीत टाकणारी होती.
भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वावरून झालेल्या वादावर बोलताना विराट म्हणाला की, मला कर्णधारपद सोडू नको असं कोणीच काही बोललं नव्हतं, मात्र काही दिवसांपूर्वी गांगुलीने सांगितले होते की, आपण विराटला कर्णधारपदावर राहा असे सांगितले होते. मात्र पत्रकार परिषदेत विराटने गांगुलीला खोटे पाडले.
टी-२० प्रकाराचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय मी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी बोलून स्पष्ट कळविला होता. भविष्याकडे बघून केलेल्या विचारामुळे या निर्णयाचे स्वागत झाले होते. तेव्हाच मी फोन कॉलवर सांगितले होते की मला कसोटी आणि वनडे संघाचं नेतृत्व करायला काहीच हरकत नाहीय.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी संघ निवडताना बैठकीअगोदर निवड समिती अध्यक्षांचा फोन आला. संघाबाबत चर्चा झाली आणि ही चर्चा संपता संपता आता आपण एकदिवसीय संघाचे कर्णधार नसणार असे थेट सांगण्यात आले, असा घटनाक्रम विराटने जाहीर केला. त्यांनाच प्रश्न विचारा.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आयोजित केलेल्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याकरिता मी उपलब्ध असल्याचे विराटने स्पष्ट केले. मुलीच्या वाढदिवसाचे कारण सांगून विराट एकदिवसीय मालिकेतून माघार घेणार आहे. अशी जोरदार चर्चा होती. यासंदर्भात विचारले असता विराट म्हणाला, तुम्हाला ज्याने मी न खेळण्याची माहिती दिली आहे त्यांनाच याचे उत्तर विचारा असा प्रतिप्रश्न त्याने केला.
रोहित शर्माशी माझा कधीच वाद नव्हता, गेल्या २ वर्षांपासून मी याबाबत वारंवाद स्पष्टीकरण देत आहे तरीही हा प्रश्न विचारण्याच येत आहे. आमच्यातील संबधांबाबत सांगून मी आता थकलो आहे. असेही विराटने सांगितले. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेकरिता रोहित नसल्याची उणीव जाणवेल, कारण त्याने इंग्लंड दौऱ्यात चांगली फलंदाजी केली होती. असेही विरटा या वेळी म्हणाला.
रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजासारखे महत्त्वाचे खेळाडू नसले तरी संघात चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि नव्या खेळाडूंना कसब दाखवायची संधी मिळेल, असेही विराटने सांगितले. तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळायला भारतीय संघ गुरुवारी खास विमानाने जोहान्सबर्गला रवाना होत आहे. पहिल्या कसोटीला २६ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.