अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता सामना जिंकला. त्याचवेळी या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली खूपच भावूक दिसत होता. विश्वचषकाच्या प्रवासाबाबत त्याने एक भावनिक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली आहे.
T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर, भारतीय संघाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका भावनिक पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमची स्वप्ने पूर्ण न करता, आम्ही निराश मनाने ऑस्ट्रेलिया सोडत आहोत. पण एक गट म्हणून आम्ही आमच्यासोबतचे अनेक अविस्मरणीय क्षण परत घेत आहोत. येथून पुढे आणखी चांगले बनण्याचे आमचे ध्येय आहे. स्टेडियममध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर आलेल्या आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. ही जर्सी घालून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो.
View this post on Instagram
अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा एकतर्फी पराभव केला आणि सामना 10 गडी राखून जिंकला. या विजयासह इंग्लंडचा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच भावूक दिसत होता. टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर आणि सामना संपल्यानंतर रोहित शर्मा खूपच भावूक दिसत होता. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे.