Virat Kohli Viral Dance: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा-जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर असतो तेव्हा तो त्याच्या चपळाईमुळे आणि त्याच्या मस्तीमुळे चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. असेच काहीसे भारत आणि नेपाळ यांच्यात खेळल्या जात असलेल्या आशिया कपच्या पाचव्या सामन्यात पाहायला मिळाले.
विराट ग्राउंडवर आपल्या मस्त डान्स मूव्ह्सने चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मैदानाच्या मध्यभागी नेपाळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
These Nepali songs can make you dance so easily😍😂😂
Virat as always🕺pic.twitter.com/FbiNcCQCsh
— David. (@CricketFreakD3) September 4, 2023
कुतुमा कुटू हे नेपाळी गाण्यांपैकी एक सर्वात प्रसिद्ध गाणे आहे. हे गाणे सहा वर्षे जुने आहे, जे पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर वाजवण्यात आले यावेळी विराट कोहली या गाण्यावर नाचताना दिसला. व्हिडिओमध्ये विराट कोहलीसोबत काही प्रेक्षकही डान्स करताना दिसत आहेत.