IPL 2023 : विराट कोहलीने रचला इतिहास, केला सर्वाधिक शतकांचा विक्रम

0
WhatsApp Group

IPL 2023 मध्ये आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत विराट कोहलीने सलग दुसरे शतक ठोकले आहे. मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात 60 चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासात त्याने आता ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच दोन सामन्यांमध्ये सलग शतके ठोकणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला.

विराट कोहलीपूर्वी आयपीएलच्या इतिहासात असे दोन खेळाडू आहेत ज्यांनी दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत. शिखर धवनने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी हे केले. तर 2022 मध्ये जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी हा पराक्रम केला होता. आता विराट असा तिसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमधील विराट कोहलाचे हे सातवे शतक होते आणि त्याने 6 शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले आहे. विराट कोहलीने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 101 धावा केल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

विराट कोहली – 7
ख्रिस गेल – 6
जोस बटलर – 5
केएल राहुल – 4
डेव्हिड वॉर्नर – 4
शेन वॉटसन – 4