IND vs SL 1st ODI: विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ मोठा विक्रम

WhatsApp Group

गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. कोहलीने 80 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी, त्याने बांगलादेश दौऱ्यावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 113 धावांची अप्रतिम शतकी खेळी खेळली होती आणि ऑगस्ट 2019 पासून सुरू असलेल्या शतकाचा दुष्काळ संपवला होता.

एकदिवसीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे हे 45 वे अर्धशतक आहे. यासह कोहलीने सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मायदेशात वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली सचिन तेंडुलकरच्या बरोबरीत पोहोचला आहे. भारतीय भूमीवर 20 शतके झळकावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याचबरोबर कोहलीने मायदेशात 20 शतके झळकावण्याचा मोठा पराक्रमही केला आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय शतके

सचिन तेंडुलकर – 164 एकदिवसीय सामन्यांमध्ये 20 शतके
विराट कोहली – 102 एकदिवसीय सामन्यांमध्ये 20 शतके
हाशिम आमला – 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 शतके
रिकी पाँटिंग – 153 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 शतके
रॉस टेलर – 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 शतके

एवढेच नाही तर कोहलीने सचिन तेंडुलकरचा श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. कोहली वनडेमध्ये लंकेविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता ज्याने लंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 8 शतके झळकावली होती. कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्धचे 9वे शतक आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका वनडेत सर्वाधिक शतके

विराट कोहली – 48 सामन्यात 9 शतके
सचिन तेंडुलकर – 84 सामन्यात 8 शतके
सनथ जयसूर्या – 89 सामन्यात 7 शतके
गौतम गंभीर – 37 सामन्यात 6 शतके
रोहित शर्मा – 46 सामन्यात 6 शतके
कुमार संगकारा – 76 सामन्यात 6 शतके

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

100- सचिन तेंडुलकर
73- विराट कोहली
71- रिकी पाँटिंग
63- कुमार संगकारा
62- जॅक कॅलिस

वनडेत सर्वाधिक शतके

49- सचिन तेंडुलकर
45- विराट कोहली
30- रिकी पाँटिंग