World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात रविवारी आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली. जेव्हा त्याने नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध 3 धावा केल्या, तेव्हा तो विश्वचषक स्पर्धेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा (1,744) बनला.
विराटने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. विराटने 37 व्या एकदिवसीय सामन्याच्या 37 व्या डावात ही कामगिरी केली आहे.
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
सचिनने 45 सामन्यांच्या 44 डावांमध्ये 56.95 च्या सरासरीने आणि 88.98 च्या स्ट्राईक रेटने 2,278 धावा केल्या होत्या.
या यादीत पॉन्टिंग तिसऱ्या स्थानावर आहे (1,743), श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा चौथ्या स्थानावर आहे (1,532), भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे (1,528*), डेव्हिड वॉर्नर सहाव्या स्थानावर आहे (1,520*) , शाकिब अल हसन 7व्या स्थानावर (1,332) आहे.
या विश्वचषकात विराटचे आकडे
विराटने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 85 धावांची इनिंग खेळली होती. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला केवळ 55 धावा तर पाकिस्तानविरुद्ध केवळ 16 धावा करता आल्या. त्याने बांगलादेशविरुद्ध 103* आणि न्यूझीलंडविरुद्ध 95 धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध त्याचे खातेही उघडले नाही. त्याने श्रीलंकेविरुद्ध 88, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101* आणि नेदरलँडविरुद्ध 51 धावा केल्या. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने 117 धावा केल्या होत्या.