
Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) इंस्टाग्रामवर 211 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर विराट कोहली आता ट्विटरवरही ‘किंग’ बनला आहे. विराट कोहलीचे ट्विटरवर 50 मिलियन फॉलोअर्स (50 million Twitter followers) झाले आहेत. अशाप्रकारे विराट कोहली ट्विटरवर 50 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला क्रिकेटर बनला आहे. ट्विटरवर फॉलोअर्सच्या बाबतीत क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या तर लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे. अशाप्रकारे या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 37.8 मिलियन फॉलोअर्स इतकी आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीनंतर विराट कोहली अव्वल स्थानावर
विशेष म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डोचे ट्विटरवर 450 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर लिओनेल मेस्सीचे 333 मिलियन फॉलोअर्स आहेत. आशिया चषक 2022 मध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची कामगिरी नेत्रदीपक होती. विराट कोहलीने आशिया कप 2022 च्या 5 सामन्यात 276 धावा केल्या. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बराच वेळ धावा काढण्यासाठी धडपडत होता, मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी करून फॉर्ममध्ये परतला. तसेच, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक झळकावले.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
विराट कोहलीनं भारतासाठी आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 104 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 12 हजार 344 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 43 शतक आणि 64 अर्धशतक झळकावली आहेत. याशिवाय, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक आणि 32 अर्धशतकांच्या मदतीनं 3 हजार 584 धावा केल्या आहेत.